Cotton Rate कापसाला देशभरात किती दर मिळाला ?
Cotton price हरियाणा राज्यातील पलवल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे. येथे कापसाला 10 हजार रुपये दर मिळाला आहे. हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढेल.त्यामुळे यंदाच्या हंगामात महाराष्ट्रातही कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि नैसर्गिक परिस्थिती यामुळे कापसाला चांगला भाव मिळू शकतो.
यावर्षी भारतातील कापूस लागवड 6.65 टक्क्यांनी वाढली आहे.देशातील नवीन कापूस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात बाजारात येतो. यावेळी मात्र ऑगस्टमध्ये कापसाचे दर आठ टक्क्यांनी वाढले आहेत.भविष्यात कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात 500 पेक्षा कमी गाठी कापूस दाखल झाला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या कापसाचा भाव जवळपास दुप्पट आहे.
येथे क्लिक करून पाहा
कापूस बाजार भाव Live